आरबीएस बँकेत भारतीय नोकरदारांना सुवर्णसंधी


नवी दिल्ली : जवळपास ४०० कर्मचारी कपात करण्याचा निर्णय ब्रिटेन सरकारच्या मालकीची रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड (RBS) व्यवस्थापनाने घेतला असून भारतीय नोकरदारांना बँकेच्या या निर्णयामुळे सुवर्णसंधी असल्याचे बोलले जात आहे. कारण बँकेला कमी गुंतवणुकीतून बँकेची काम पूर्ण करुन घ्यायची असल्याने, यातील बहुतांश नोकऱ्या भारतात हस्तांतरित केल्या जाणार आहेत.

व्यवसायिक कर्ज विभागातील ४४३ जणांना कमी करण्याचा निर्णय आरबीएस बँक व्यवस्थापनाने घेतला आहे. बँकेकडून हा निर्णय नित्य प्रक्रियेचाच भाग असल्याचे सांगितले जात आहे. पण यातून भारतीय नोकरदारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. याबाबत बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, सध्या बँकेचे स्वरुप लहान झाले असल्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीत आम्ही काही बदल करत आहोत. ज्या माध्यमातून आमच्या असंख्य ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्या जाणे शक्य होईल. त्यासाठी दुर्दैवाने ब्रिटेनमधील आमच्या ४४३ कर्मचाऱ्यांची कपात करावी लागणार आहे. तेव्हा या निर्णयाने आमच्या बँक कर्मचाऱ्यांच्या कामावर नक्कीच नकारात्मक परिणाम होईल. बँकेच्या या निर्णयामुळे भारतीय नोकरदारांना सुवर्णसंधी असल्याचेही बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले. आरबीएस बँकेत सध्या ब्रिटन सरकारची ७३ टक्के गुंतवणूक असल्यामुळे या बँकेला ब्रिटनची सरकारी बँक म्हणूनच ओळखले जाते.

Leave a Comment