
मुंबई: स्टेअरिंग पॉवर होजमध्ये बिघाड असलेल्या ३९,३१५ कार फोर्ड इंडियाने परत मागवल्या आहेत. चेन्नईतील प्लांटमध्ये २००४ ते २०१२ साली तयार झालेल्या फिएस्टा क्लासिक आणि फिगो हॅचबॅक कारमध्ये ही समस्या असल्याचे आढळून आले आहे.
तब्बल ३९,३१५ कार फोर्डने परत मागवल्या
याबाबत कंपनीने म्हटले आहे की, ज्या ग्राहकांच्या कारमधील स्टेअरिंग होजमध्ये बिघाड असेल त्यांनी आपल्या जवळच्या फोर्ड डीलरशीपच्या येथे जाऊन आपल्या कारमधील बिघाड दुरुस्त करुन घ्यावा. दरम्यान, भारतात सध्या फिएस्टा क्लासिक आणि जुन्या फिगो हॅचबॅक कारची विक्री बंद आहे. सध्या बाजारात दुसऱ्या जनरेशनची फिगो हॅचबॅक कार उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत ४.७५ लाख (एक्स शोरुम) आहे.
