
मुंबई : आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी देशातील मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने नवी मान्सून ऑफर लाँच केली आहे. कंपनी या ऑफरनुसार एक जुलैपासून पुढील तीन महिने ३० जीबी डेटा मोफत देणार आहे.
एअरटेल देणार ३० जीबी डेटा मोफत
कंपनीने याआधी पोस्टपेड ग्राहकांसाठी एप्रिल ते जूनपर्यंत ३० जीबी फ्री डेटाची सरप्राईज ऑफर दिली होती. मान्सून ऑफरअंतर्गत पोस्टपेड़ ग्राहकांना दर महिन्याला १० जीबी डेटा पुढील तीन महिन्यांपर्यंत फ्री मिळणार आहे. ही ऑफर १ जुलैपासून सुरु होत आहे. एअरटेलने शनिवारी ईमेलद्वारे या नव्या ऑफरची माहिती आपल्या ग्राहकांना दिली. ही ऑफर सुरु करण्यासाठी ग्राहकांना १ जुलैनंतर माय एअरटेल अॅपवरुन क्लेम करावी लागेल. ही ऑफर केवळ पोस्टपेड ग्राहकांना दिली आहे.
