सायकलने भारत भ्रमंतीवर निघाल्या ७० वर्षांच्या आजीबाई


खामगाव : चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून ७० वर्षीय आजीबाई भारत भ्रमंतीला निघाल्या आहेत. या सुपर आजीने आतापर्यंत माहूरगड, वैष्णवदेवीपर्यंतचा तब्बल ४००० किलोमीटरचा प्रवास मागील दोन वर्षात पूर्ण केला असून यावर्षी वैष्णोदेवीच्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकलने पूर्ण करणार आहे.

या सुपर आजीचे नाव रेखा जोगळेकर असे असून, एम.ए.बी.एड पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले आहे. अगोदरपासूनच संसाराची धुरा सांभाळत या सुपर आजीने जिल्हा परिषदेत तब्बल ३० वर्ष केंद्रप्रमुख म्हणून कामसुद्धा केले आहे. सेवानिवृत्तीनंतर काहीतरी अनोखे करण्याची जिद्द घेऊन या सुपर आजीने गेल्या तीन वर्षापासून भारत भ्रमंतीचा प्रवास सुरू केला आहे. या वयात काहीतरी हटके करून दाखविण्याची प्रेरणा त्यांच्या आईकडून मिळाली असल्याचे त्या सांगतात.

Leave a Comment