ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर आजपासून धमाकेदार ऑफर्स - Majha Paper

ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर आजपासून धमाकेदार ऑफर्स


मुंबई : ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर आजपासून धमाकेदार ऑफर्स देण्यात येणार असून ५० ते ८० टक्क्यांपर्यंत बंपर सेल अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर जाहीर करण्यात आला आहे.

२३ ते २५ जून अमेझॉनवर, २४ ते २६ जूनमिंत्रावर, २४ ते २६ जून फ्लिपकार्टवर, स्नॅपडीलवर आज आणि उद्या हा सेल सुरु राहणार असल्यामुळे शॉपिंग लव्हर्सकरता ही एक पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान, काही साईट्सवर अगदी ८० टक्क्यांपर्यंत सेल आहे,

दुसरीकडे देशात १ जुलैपासून सर्वत्र जीएसटी लागू होणार असल्याने, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो मोबाईल कंपन्यांनी आपल्या उत्पादनांवर भरघोस सूट देऊ केली आहे. जीएसटीमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या गाड्यांवर १५ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला आहे.

Leave a Comment