१ जुलै पासूनच लागू होणार जीएसटी – अरुण जेटली


नवी दिल्ली : आपल्याकडे वस्तू आणि सेवा कराची तारीख पुढे ढकलण्याचा वेळ नसल्यामुळेच जीएसटी परिषदेच्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर १ जुलैपासूनच लागू करण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जीएसटी १ जुलैपासून लागू न करण्याची मागणी असोचेम या देशातील मोठ्या उद्योग संघटनेने केली होती. ही मागणी फेटाळून लावत १ जुलैपासूनच आम्ही जीएसटी लागू करणार असे, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केले आहे.

असोचेमने नवी करप्रणाली लागू करण्यासाठी आणखी थोडा वेळ घ्यावा असे शनिवारी म्हटले होते. या संस्थेने यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना पत्र लिहून वस्तू आणि सेवा करांची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यास आयटी विभाग यासाठी पूर्णपणे तयार नसल्यामुळे करदात्यांना वस्तू आणि सेवा कर भरताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. मात्र असोचेमची ही मागणी फेटाळण्यात आली आहे. सरकार आणि कंपन्यांना वेगाने होणाऱ्या सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी सुरक्षेचे कठोर उपाय योजले पाहिजेत असे मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment