ट्विटरच्या ‘मान्सून इमोजी’वर भाळले मुख्यमंत्री


पाऊस म्हणजे काय हे मुंबईकरांना वेगळे सांगायला नको. पावसाळा म्हटले की मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ होणारच हे मात्र तेवढेच खरे आहे. त्यातच लोकल बंद , रस्त्याचे रूपांतर नद्या नाल्यात होणे आणि जस जसा पाऊस जोर धरू लागेल तेव्हा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण होणे हे सारे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही. तेव्हा यावेळीच्या पावसात या पेक्षा नवे काही पाहायला मिळणार अशी शक्यता काही मुंबईकरांना नाही. मुंबईत आता जे काही बदल पाहायला मिळतील तेव्हा मिळतील पण ट्विटरवर मात्र या पावसाळ्यात एक वेगळाच बदल पाहायला मिळणार आहे.

ट्विटर इंडियाने खास पावसाळ्यानिमित्त नवे इमोजी लाँच केले आहे. तेव्हा ट्विटरवर पावसाशी निगडीत काहीही टि्वट करताना जर #indiarains, #MumbaiRains, #बारिश हे हॅशटॅग वापरले तर पुढे छत्रीचा इमोजी दिसणार आहे. ट्विटरच्या नव्या हॅशटॅश आणि इमोजीची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याची दिली आहे. तसेच ते यावेळी मुंबईकरांना मान्सूनच्या शुभेच्छाही द्यायला विसरले नाही. ट्विटर इंडियाने यापूर्वी दिवाळी आणि गणपतीनिमित्त असे खास इमोजी आणले होते.

Leave a Comment