ट्विटरने बदलले आपले रुपडे


सोशल मिडिया साईट्स दिवसेंदिवस आपापल्या युझर्सला आकर्षक सेवा देण्यासाठी खूप मेहनत करत आहेत. आपला युझर आपल्याला काहीही करुन सोडून दुसऱ्या साईटवर शिफ्ट नाही झाला पाहिजे, यावर या कंपन्याचा कटाक्ष असतो. फेसबुक,व्हॉट्सअप ,ट्विटर आदी कंपन्या तर त्यामध्ये फारच आघाडीवर आहेत.

यामध्ये मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरही मागे राहू इच्छित नाही. ट्विटरने नुकतेच आपल्या लेआऊटमध्ये काही बदल करून आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विटरने नवीन लेआऊटमध्ये साइट आणखी सोपी करण्याचा प्रयत्न केला असून यापूर्वी ट्विटर युझरचा प्रोफाइल फोटो हा चौकोनात असायचा आता नवीन लेआऊट मध्ये प्रोफाइल फोटो गोलाकारमध्ये आहे. त्याचप्रमाणे हेडलाईन आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड असणार आहे. तसेच आता रिट्विट करणे ,लाईक करणे अधिक सोपे आणि गतिमान केले आहे. नविन लेआऊट हे सर्व ठिकाणी दिसणार आहे जसे की ट्विटर डॉट कॉम, अँड्रॉइड अँप, आयओएस अँप आदी सर्व ठिकाणी हा लेआऊट बदल दिसणार आहे.

Leave a Comment