ध्येयाने झपाटलेला भारतीय वंशाचा अमेरिकन तरुण अब्जाधीशांच्या यादीत


नवी दिल्ली – अमेरिकेत भारतीय वंशाचा ३१ वर्षीय ऋषी शाह हा तरुण अब्जाधीश बनला असून कॉलेजचे शिक्षण १० वर्षापूर्वी सोडलेल्या या तरुणाला लहानपणापासूनच उद्योगपती बनण्याचे स्वप्न होते. नुकतेच अब्जाधीशांच्या यादीत ध्येयाने झपाटलेला या तरुणाचे नाव सहभागी करण्यात आले आहे.

२००६मध्ये शाह यांनी ६० कोटी डॉलरची गुंतवणूक करत ‘आऊटकम हेल्थ’ कंपनीची स्थापना केली होती. अमेरिकेतील शिकागो येथे त्याची ही हेल्थ केयर टेक कंपनी आहे . ऋषी मूळचा भारतीय असून त्याचे वडिल डॉक्टर आहेत. या कंपनीची आताची किंमत ३६० अब्ज म्हणजेच ५.६ अब्ज डॉलर ऐवढी आहे. शिकागोच्या ओक ब्रुक येथे ऋषी शिकला असून त्याचे वडिल डॉक्टर असून ते बऱ्याच वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. .

या कंपनीतर्फे डॉक्टरांच्या कार्यालयातील कंटेंट तयार करण्याचे काम करण्यात येते. आपल्या बहीणीच्या प्रेरणेतून हा विचार सुचल्याचे शाह याने सांगितले. नॉर्थवेस्ट विद्यापीठातून ऋषीने प्रशिक्षण घेतले असून शिक्षणादरम्यान त्याची श्रद्धा अग्रवाल नावाच्या महिलेशी ओळख झाली. जी आज त्याच्या कंपनीची अध्यक्ष आहे. एका कॅंपस मॅगझिनसाठी लिखाण करत असताना त्या दोघांनी कॉन्टेक्स मिडिया नावाची कंपनी स्थापन केली. यासाठी त्यांनी कर्जही घेतले. जे काही दिवसांतच २०८८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. त्याचवेळी शिकागोमधील डॉक्टरांकडे जात त्यांनी आपल्या डोक्यातील संकल्पना त्यांना सांगण्यास सुरुवात केली.

ही कंपनी आजच्या घडीला केवळ यूनिकॉर्न कंपनीचा दर्जा मिळालेली कंपनी नसून ही जवळपास ६४.२६ अब्ज रुपये किंमत असलेली कंपनी आहे. या कंपनीचा एकूण २०० कंपन्यांच्या यादीत ३० वा क्रमांक आहे. ही कंपनी काही फिजिशियन आणि रुग्णालयांना व्हिडिओ मॉनिटरची सुविधा पुरवते. लवकरच या यादीत श्रद्धा अग्रवालही स्थान मिळवेल अशी आशा आहे.

Leave a Comment