इंडिगो घडविणार केवळ ८९९ रूपयांत विमान प्रवास!


चेन्नई: इंडिगो एअरलाईन्सने ग्राहकांसाठी एक खूपच धमाकेदार ऑफर आणली असून तुम्ही जर देशांतर्गत पिकनीक प्लॅन करत असाल तर फारच मोजक्या पैशांमध्ये तुम्हाला विमानाने प्रवास करता येणार आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या ऑफरनुसार केवळ ८९९ रूपयांत विमानाने देशभरात कुठेही जाता येणार आहे. एअरलाइन कंपनी इंडिगोने तशी मान्सून ऑफरच दिली आहे.

तुम्हाला आजपासून १४ जूनपर्यंत या ऑफर अंतर्गत तिकीट बुक करता येणार आहे. यात ३९ देशातील रूटवर केवळ ८९९ रूपयांत विमानाचे तिकीट बुक करता येणार आहे. दोन दिवसात तिकीट बुक केल्यानंतर १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे. मुंबई-गोवा, जम्मू-अमृतसर, दिल्ली-उदयपूर, अहमदाबाद-मुंबई, चेन्नई-पोर्ट ब्लेअर, हैदराबाद-मुंबई, कोलकाता-अगरताळा, दिल्ली-कोईम्बतूर आणि गोवा-चेन्नई या मार्गावर केवळ ८९९ रूपयात फिरता येणार आहे. ही तिकीट विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. तर एकदा तिकीट बुक केल्यावर ते रद्द केल्यास पैसे परत मिळणार नसल्याचेही इंडिगोने म्हटले आहे.

दरम्यान यापूर्वी प्रवाशांनी इंडिगोच्या समर स्पेशल सेलला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. प्रवाशी या ऑफरलाही चांगला प्रतिसाद देतील अशी आशा आहे. थ्री डे मान्सून स्पेशल ऑफरनुसार मुंबई-चेन्नईसाठी १९९९ रूपये, दिल्ली-चेन्नईसाठी ३३९९ रूपये आणि बंगळूरू-चेन्नईसाठी ११९९ रूपये तिकीट ठेवण्यात आले असल्याचे इंडिगोचे मुख्यअधिकारी संजय कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment