१७३४ रुपयांत मिळणार जिओचा 4G स्मार्टफोन


मुंबई: टेलिकॉम विश्वातील इतर टेलिकॉम कंपन्यांनी झोप उडवणारी जिओ कंपनी आता स्मार्टफोन निर्मात्यांची झोप उडवण्याच्या तयारीत असून ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ 4G स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत असून रिलायन्स जिओ 4G VoLTEला सपोर्ट करणारा फोन लवकरच लाँच करणार आहे. या 4G फोनची किंमत इतर स्मार्टफोनपेक्षा फारच कमी आहे.

याबाबतचे वृत्त ९१ मोबाइल डॉट कॉम या गॅझेट्स या वेबसाइटने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या रिलायन्स जिओ 4G VoLTE या स्मार्टफोनची किंमत १७३४ रुपये ते १८०० रुपयांपर्यंत असणार आहे. रिलायन्स जिओचा भारतातील गरिबातील गरीब ग्राहकापर्यंत सेवा पोहोचवण्याचा मानस आहे. रिलायन्स 4G VoLTE या मोबाईलचे दोन व्हेरिएंट्स लाँच करणार असून रिलायन्स जिओ या मोबाईलमध्ये Qualcomm आणि Spreadtrum प्रोसेसरचा वापर करणार आहे. Qualcomm प्रोसेसरच्या मोबाईलची किंमत १७३४ रुपयांपर्यंत असणार आहे. Spreadtrum मोबाईलची किंमत १८०० रुपये असेल. या मोबाईलचे उत्पादनही सुरू करण्यात आले आहे.

रिलायन्स जिओचे आतापर्यंत १० कोटी युझर्स झाले आहेत. जिओच्या या नव्या 4G VoLTE स्मार्टफोनची स्क्रीन २.४ इंच आहे. तसेच या मोबाईलमध्ये ५१२ एमबी रॅम देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी इंटर्नल मेमरी असेल. 4G VoLTE स्मार्टफोनला मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट करणार आहे. तसेच २ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि व्हिजीए फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही वायफायही कनेक्ट करू शकता. तसेच 4G VoLTE या स्मार्टफोनमध्ये जीपीएस प्रणालीही बसवण्यात आली आहे. रिलायन्स जिओचे बाजारात 5 कोटी हँडसेट विकण्याचे लक्ष्य असल्यामुळे लवकरच ग्राहकांना जिओचा स्वस्तातला मोबाईल मिळणार आहे.

Leave a Comment