
मुंबई : स्काईपचे नवीन व्हर्जन मायक्रोसॉफ्टने लॉन्च केले असून अँड्रॉइडवर स्काईपच्या नवीन आवृत्ती ८.० ची ओळख स्काईपच्या टीमने करुन दिली आहे. आपण स्काईप ८.० गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. या नंतर तो आयओएस, विंडोज आणि मॅकवर सुद्धा अपडेट केल जाणार आहे.
स्काईपचे लॉन्च केले नवीन व्हर्जन
चॅट्स, कॅप्चर आणि फाईंड असे ३ टॅब ह्या व्हर्जनमध्ये असतील. स्काईपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये आपले खास क्षण शेअर करण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतील, तसेच आपण चॅट मधील प्रत्येक मॅसेजवर रिअॅक्ट करू शकता, तसेच व्हिडिओ कॉलमध्येही रिअॅक्ट करू शकता. ह्या स्काईप व्हर्जनमध्ये ‘फाईंड’ हे नवीन फीचर अॅड झाले आहे. यामध्ये GIFs सारख्या अनेक गोष्टी अटॅच करू शकता.
