ग्राहकांना रिलायन्स जिओ देणार ३ गुड न्यूज


मुंबई : आपल्या ग्राहकांसाठी जिओ पुन्हा एकदा खूशखबर घेऊन आला आहे. आपल्या ग्राहकांना जिओ लवकरच सरप्राईज देणार आहे. जिओकडून ग्राहकांना ३ गुड न्यूज मिळणार आहे. पहिली खुशखबर ही आहे की, जिओने इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत १९.१२ एमबीपीएसचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. डाउनलोडिंग स्पीडमध्ये जिओने सर्व कंपन्यांना मागे टाकले आहे. जिओने १८.४८ एमबीपीएस असा स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे.

दुसरी खुशखबर म्हणजे रिलायंस जिओ दिवाळीत आपली फायबर ब्रॉडबँड सर्विस लॉन्च करणार असून अनेकांना ज्याची प्रतिक्षा आहे. ज्यामध्ये जिओ ५०० रुपयांमध्ये १०० जीबी डेटाची ऑफर देऊ शकते. यामुळे टेलीकॉम सेक्टरमध्येही प्राईस आणि डेटा वॉर सुरू होऊ शकतो. ज्याचा सरळ फायदा ग्राहकांनाच होणार आहे. तिसरी खुशखबर म्हणजे कंपनीने कमी किंमतीत फीचर फोन लॉन्च करण्याची तय़ारी केली आहे आणि जिओच्या या फीचर फोनची किंमत १५००च्या आत असू शकते.

Leave a Comment