बाजारात लवकरच दाखल होणार जिओचा फीचर फोन


मुंबई : भारतीय इंटरनेट जगतात रिलायन्स जिओने एक नवी क्रांती घडवून आणली असून रिलायन्स जिओ टेलिकॉमनंतर आता अनेक नव्या प्रोडक्ट आणि सेवांवर काम करत आहे. लवकरच कंपनी ४जी VoLTE फीचर फोन आणणार असल्याची चर्चा सुरु आहे.

जिओच्या या फीचर फोनचे उत्पादन सुरु झाल्याचे वृत्त एक वेबसाईटने दिले असून लवकरच हा फोन बाजारात उपलब्ध असेल. या रिपोर्टमध्ये जिओच्या या फोनचे फीचरही देण्यात आले आहेत. ज्यानुसार, या फोनची स्क्रीन २.४ इंच असून याच्या प्रोसेसर कंपनीने क्वॉलकॉम आणि स्प्रेडट्रमशी करार केला आहे. याशिवाय या जिओ फिचर फोनमध्ये दोन मॉडेल येतील. दोन्ही मॉडेल ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल मेमरी असणार आहे. तसेच एसडी कार्डच्या मदतीने मेमरी वाढवता येणार आहे. तसेच यामध्ये २ मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर व्हिजीए फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल. यामध्ये जिओ अॅप प्रीलोडेट असेल. याची खासियत म्हणजे हा फोन NFC कनेक्टिव्हिटी आणि वाय-फायही सपोर्ट करेल. तसेच यामध्ये जीपीएस सपोर्टिव्ह असेल. यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन हा फीचर फोन तयार करण्यात येत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या रिपोर्टनुसार या स्मार्टफोनची किंमत १५०० रुपये असू शकते.

Leave a Comment