ट्रायंफची नवी स्ट्रीट ट्रीपल ७६५ , जूनमध्ये भारतात


युकेची दुचाकी वाहन उत्पादक कंपनी ट्रायंफने त्यांची नवी बाईक स्ट्रीट ट्रीपल ७६५ येत्या १२ जूनला भारतात दाखल होत असल्याचे जाहीर केले आहे. तीन व्हेरिएंटमध्ये ती भारतात येत असून त्याचे प्रीबुकींग सुरू झाले आहे. बुकींगसाठी १ लाख रूपये भरावे लागणार आहेत. या बाईकची अधिकृत किंमत अजून जाहीर केली गेलेली नाही मात्र तज्ञांच्या मते ही बाईक ९ लाख रूपयांपर्यंत असेल.

ही बाईक स्ट्रीट ट्रीपल एस, आर व आरएस अशा तीन व्हेरिएंटमध्ये आहे. या बाईकसाठी ७६५ सीसीचे ३ सिलींडर १२ व्हॉल्ट इंजिन दिले गेले असून ती सिक्स स्पिड गिअरबॉक्ससह आहे. एबीएस, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, रायडींग मोडस तसेच रेन अॅन्ड रोड नावाचे रायडिंग मोडस दिले गेले आहेत. एलईडी पोझिशन हेड लाईट, सेल्फ कॅन्सलींग इंडिकेटर्स अशी तिची अन्य फिचर्स आहेत. ही बाईक मागच्या मॉडेलपेक्षा दोन किलो कमी वजनाची असून तिच्या टाकीची इंधन क्षमता १७.४ लिटरही आहे.

Leave a Comment