मेट्रो स्टेशनला देता येणार आपले नांव


नॉयडा ग्रेनो मेट्रो सेवेने महसूल वाढीसाठी उद्येाजक, बड्या कंपन्यांना प्रसिद्धी मिळविण्याची एक संधी खुली केली आहे. त्यानुसार मेट्रो स्टेशन नेमिंग राईट ही योजना राबविली जात आहे. यात मेट्रो रेल कार्पोरेशन एक्वा लाईनवरील सर्व २१ स्टेशन्ससाठी नेमिंग राईटस विकणार आहे. त्यासाठीचे एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट जाहीर करण्यात आले असून इच्छुक कंपन्या, कापोरेट संस्था १९ जनपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

इच्छुक कंपन्यांतून निवडलेल्या कंपन्या, संस्था, स्टेशनच्या नावापूर्वी अथवा नंतर त्यांचे नांव जोडू शकणार आहेत. त्याबदली त्यांना स्टेशनच्या देखभालीची जबाबदारी घ्यावी लागेल तसेच कार्पोरेट महसूलही भरावा लागेल. स्टेशनवर होण्यार्‍या गर्दीच्या प्रमाणानुसार प्रत्येक स्टेशनसाठी हे दर वेगळे असतील. मेट्रो कार्पोरेशनचे प्रमुख केशवकुमार म्हणाले, नावे दिल्यानंतर विविध थीमनुसार स्टेशन विकसित केले जाईल. यातही नांवे देणार्‍या संस्थांची महत्त्वाची भूमिका असेल. यामुळे प्रवासी प्रत्येक स्टेशनवर अनेक प्रकारची खास वैशिष्ठे पाहू शकतील व परिणामी त्यांचा प्रवास मजेचा होऊ शकेल.

Leave a Comment