अरब देशातील सर्वात जुन्या मशिदीवर चक्क शिवलिंग


नवी दिल्ली – सोशल मीडियात सध्या अरब देशातील सर्वात जुन्या मशिदीचा फोटो प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल करण्यामागचे कारणही तसे खास आहे. हा फोटो पुनीत शर्मा नावाच्या एका व्यक्तीने शेअर करत दावा केला आहे की, अरब देशातील सर्वात जुनी ही मशिदी आहे आणि या मशिदीवर चक्क शिवलिंग असल्याचे पहायला मिळत आहे.

या मशिदीचे नाव रासा असल्याचे पुनीत नावाच्या व्यक्तीने म्हटले आहे. गेल्यावर्षी दोन फेब्रुवारी रोजी पुनीतने हा फोटो शेअर केला होता. त्यानंतर हा फोटो असंख्य लोकांनीही शेअर केला. या मशिदीच्या भिंतीवर भगवान शिव आणि नंदी यांची प्रतिमा स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करताना पुनीतने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, रासा ही अरबमधील सर्वात जुनी मशिद आहे.

फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या मशिदीचा फोटो पुनीतसोबतच अनेकांनी शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, ही माहिती खरी आहे की नाही हे माहिती नाही. पण अनेकांनी ही माहिती खोटी असल्याचाही दावा केला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर काहींनी दावा केला आहे की, रासा नावाची कुठलीही मशिद सौदी अरबमध्ये नाही आणि अरबमधील मशिदी-ए-हरम तसेत मशिदी-ए-कुबा या सर्वात जुन्या मशिदी असल्याचेही म्हटले जात आहे.

Leave a Comment