इन्फोसिसला २० हजार नव्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता


नवी दिल्ली: यंदाच्या वर्षी तब्बल २० हजार नव्या कर्मचाऱ्यांची भारतातील अग्रगन्य आयटी कंपनी इन्फोसिसला आवश्यकता असल्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तरूण, तरूणींना नोकरीसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इन्फोसिसने याच वर्षी मुल्यांकनात नापास झाल्याचे कारण देत तब्बल ४०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे.

याबाबतची माहिती इन्फोसिसचे मुख्य कामकाज अधिकारी प्रवीण राव यांनी दिली असून राव यांनी माहिती देताना म्हटले आहे की, झपाट्याने बदल होत असल्यामुळे नव्या रोजगारांची निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. या संदर्भामध्ये देशाचे माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांची राव यांनी नुकतीच भेट घेतली. या पार्श्वभूमिवर बोलताना राव म्हणाले, दरवर्षी कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन इन्फोसिसमध्ये कामगिरीवर आधारित होते. यंदा अशा मूल्यांकनानंतर ३०० ते ४०० जणांना कामावरून कमी करण्यात आले. दरम्यान, नारायण मूर्ती यांनी नोकरकपातीसंदर्भात केलेल्या विधानावर भाष्य करताना मात्र राव यांनी मौनच बाळगले.

दरम्यान, देशात अलिकडील काही काळात डिजिटलचे वारे वेगाने वाहात आहे. डिजीटल युगाचा भारत सरकारनेही जोरदार प्रचार आणि प्रसारही सुरू केला आहे. जगभरातही डिजीटल युगात नवी क्रांती घड़त असल्यामुळे येत्या काळात या क्षेत्रात प्रचंड नोकऱ्या उपलब्ध होतील असे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Comment