फेसबुकचा अतिवापर आरोग्यासाठी हानीकारक!


न्यूयॉर्क : फेसबुक अपडेट घडोघडी पाहणाऱ्यांसाठी ही बातमी खुप महत्त्वाची असून फेसबुकचा अतिवापर, तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा निष्कर्ष एका नव्या संशोधनात नोंदवण्यात आला आहे. याबाबतचे संशोधन अमेरिकेतील येल विद्यापीठ आणि कॅलिफोर्नीया, सॅन डिएगोच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.

संशोधन करणाऱ्या डॉक्टरांनी यासाठी २०१३ ते २०१५ दरम्यान पाच हजार २०८ जणांचा अभ्यास केला. फेसबुकच्या वापरामुळे त्यांचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? हे यात तपासले गेले. फेसबुकचा अतिवापर करणाऱ्या व्यक्तींचा सामाजिक, शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे या प्रदीर्घ अध्ययनानंतर दिसून आले. विशेष म्हणजे, ज्या व्यक्ती स्वत:ची फेसबुक प्रोफाईल सरासरीपेक्षा जास्त पाहतात, त्यांना मानसिक आजाराचा धोका संभवत असल्याचा निष्कर्षही या डॉक्टरांच्या चमूने नोदंवला आहे.

यूसीएसडीचे सहाय्यक प्राध्यापक आणि येल विद्यापीठाचे निकोलस क्रिस्ताकिस यांच्या नेतृत्वाखाली फेसबुक संदर्भातील हा संशोधनाचा हवाल तयार करण्यात आला आहे. अमेरिकन जर्नल ऑफ अॅपिडेमियोलॉजी या पत्रिकेत हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

नोट : या अहवालाच्या दाव्याची पडताळणी माझा पेपर न केल्यामुळे ते अंमलात आणण्यापूर्वी तुम्ही डॉक्टारांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

Leave a Comment