आधारकार्डशी मोबाइल नंबर लिंक करणे अनिवार्य!


मुंबई: टेलिकॉम कंपन्यांना मार्च महिन्यात दूरसंचार मंत्रालयाने सर्व यूजर्सला आधारकार्डच्या सहाय्याने पुन्हा व्हेरिफाय करण्याचे आदेश दिल्यानंतर यूजर्सला एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांनी मेसेज पाठवणेही सुरु केले आहे.

याबाबत इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या यूजर्सला मेसेज पाठवून आधारनंबर लिंक करण्यास सांगितले आहे. आपला नंबर चालू ठेवण्यासाठी आधारकार्डशी लिंक करा, असा मेसेज कंपनीकडून पाठवण्यात येत आहेत. जे नंबर व्हेरिफाय होणार नाहीत किंवा आधारशी लिंक होणार नाहीत ते नंबर ६ फेब्रुवारी २०१८ पासून भारत अवैध मानले जातील.

असा करा आपला मोबाइल नंबर आधारकार्डशी लिंक:
१) हा मेसेज मिळताच आपल्या जवळच्या ऑपरेटर स्टोरमध्ये जा.
२) तुमचे आधार कार्ड घेऊन तिथे जा. आणि त्यातील माहिती स्टोरला द्या.
३) त्यानंतर तुमच्याकडे व्हेरिफिकेशन नंबर येईल. हा व्हेरिफिकेशन नंबर कन्फर्म केल्यानंतर तुमचे फिंगर प्रिंट व्हेरिफिकेशन होईल. मग तुमचा नंबर २४ तासात आधारकार्डशी लिंक होईल.

Leave a Comment