टीव्हीएसची नवी जेस्ट ११० स्कूटी लाँच


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टीव्हीएसने आपली नवी जेस्ट ११० ही स्कूटर लाँच केली आहे. या नव्या स्कूटरमध्ये चार नवे मेटे बेस्ड् कलरच्या सीरीज देण्यात आली आहे. या नव्या स्कूटर ११०मध्ये बॅकलिट स्पीडोमीटर, एलईडी टेललॅम्प, टेक्शर्ड फ्लोरबोर्ड, स्टेनलेस स्टील मफ्लर गार्ड, ऑप्शनल डय़ुअल सीट कलर, युएसबी चार्जिंग, १९ लिटर अंडर सीटर स्टोरेज, सेंटर स्टँड आणि किकस्टार्ट असे फिचर्स देण्यात आले असून या स्कूटीची किंमत (दिल्ली एक्स-शोरुम) ४८ हजार ०३८ रुपये ऐवढी ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment