जगातील सर्वात महागडा फोन सिग्नेचर कोब्रो सादर


नवी दिल्ली – आपले नवे मोबाईल जगातील सर्वात महागडा मोबाईल फोन निर्माण करणारी कंपनी व्हर्च्यूने सादर केले असून या मॉडेलचे नाव व्हर्च्यू सिग्नेचर कोब्रा असे आहे. ज्याची किंमत ३,६०,००० अमेरिकी डॉलर (२.३० कोटी रुपये) ऐवढी आहे. सिग्नेचर कोब्राला या कारणाने जगातील सर्वात महागडा फोन म्हणून संबोधले जात आहे.

विशेष म्हणजे व्हर्च्यूचे सिग्नेचर कोब्रा हे मॉडेल स्मार्टफोन नसून एक सामान्य फीचर फोन असून आकर्षक डिजाईन या फोनचे वैशिष्टय़ असून याच्या चारही कोप-यावरती सापाची आकृती बनविण्यात आली आहे. सापाची आकृती बनवण्यासाठी ४३९ रूबींचा (मोती) वापर करण्यात आला आहे. तर सापाचे डोळे एमरैल्ड (पन्ना) मोतींपासून बनवण्यात आले आहेत. फोनमध्ये २ इंच टीएफटी डिस्प्ले उपलब्ध असून त्याला सफायर क्रिस्टलद्वारे संरक्षित करण्यात आले आहे. तसेच अंतर्गत मेमरी १६ जीबीची असून रॅम २ जीबी क्षमतेचा आहे. या मोबाईलची विक्री ई-कॉमर्सद्वारे कंपनीकडून करण्यात येत असून संकेतस्थळाद्वारे ग्राहक त्याची खरेदी करू शकतात. चीनमधील अन्य इ-कॉमर्स कंपन्यांद्वारे याची विक्री करण्यात येत आहे. या संकेतस्थळाद्वारे आगाऊ रक्कमेचा भरणा करून मोबाईल बुक करणा-या ग्राहकांना हेलीकॉप्टरद्वारे घरपोच डिलीव्हरी देण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment