शाओमीने लाँच केला Mi Max 2 स्मार्टफोन


मुंबई: आपला नवा Mi Max 2 हा स्मार्टफोन चीनी मोबाइल कंपनी शाओमीने लाँच केला असून सध्या हा नवा स्मार्टफोन कंपनीने चीनमध्ये उपलब्ध करून दिला आहे. पण हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच करण्यात येणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

दोन व्हेरिएंटमध्ये Mi Max 2 उपलब्ध असून ६४ जीबी मॉडेलची किंमत १६९९ युआन (१६००० रुपये) आणि १२८ जीबी मॉडेलची किंमत १९९९ युआन (१९००० रुपये) आहे. हा स्मार्टफोन १जूनपासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

शाओमी Mi Max 2 स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच स्क्रिन, रेझ्युलेशन १०८०×१९२० पिक्सलचा डिस्प्ले, २GHz ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर, ४ जीबी रॅम, बॅक फिंगर प्रिंट सेन्सर, अँड्रॉईड नॉगट ७.० ऑपरेटिंग सिस्टम, १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ड्युल एलईडी फ्लॅश, ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment