एअरटेल देणार १ हजार जीबी डेटा मोफत


एअरटेलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता चांगलीच कंबर कसली असून एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर ऑफर आणली आहे. ग्राहकांना एअरटेलच्या नव्या प्लाननुसार एक हजार जीबी डेटा देण्यात येणार आहे. ब्रॉडबँड युजर्ससाठी हा प्लान आहे. एअरटेलच्या नव्या ऑफरनुसार ग्राहकांसाठी एकूण चार प्लान असणार आहे. ज्याअंतर्गत एका वर्षासाठी एक हजार जीबी डेटा मोफत मिळणार आहे.

एअरटेलने १०९९ रुपये, १२९९ रुपये, १४९९ आणि १७९९ या किंमतीचे वेगवेगळे प्लान आणले आहेत. या ऑफरमध्ये आता सगळ्यात स्वस्त प्लानची सुरूवात ८९९ पासून आहे. ग्राहकांना वर्षाला याअंतर्गत ७५० जीबी डेटा मोफत मिळणार आहे. त्याचप्रमाणे हायस्पीड इंटरनेटसाठी एअरटेलने ‘व्ही-फायबर’ ब्रॉडब्रँड आणले होते. त्यामुळे १०० एमबीपीएस स्पीडने डाऊनलोडिंग करणे शक्य होणार आहे.

एअरटेलने दोन महिन्यांपूर्वी पोस्टपेड ग्राहकांसाठी ‘सरप्राईज’ ऑफर आणली होती. एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांना ३० जीबी ४जी डेटा सरप्राईज गिफ्ट म्हणून दिला होता. दर महिन्याला हा डेटा १० जीबी या प्रमाणात ३ महिन्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला. रिलायन्स जिओ आणि त्यांच्या प्राईम ऑफर्सला टक्कर देण्यासाठी एअरटेलने ग्राहकांना सरप्राईज गिफ्ट दिले होते. माय एअरटेल अॅपच्या माध्यमातून पोस्टपेड ग्राहकांना हा डेटा मोफत देण्यात आला होता. या ऑफरमुळे ग्राहकांना ४ जीच्या वेगाने दर महिन्याला १० जीबी डेटाचा लाभ घेता येत आहेत.

Leave a Comment