चलनातून बाद झालेल्या नोटांमधून ‘तो’ करतो वीजनिर्मिती


नवी दिल्ली – गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटेचे महत्व एका फटक्यात शून्य झाले. आता एवढ्या नोटांचे करायचे काय ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. ज्यांनी बेकायदेशीर मार्गाने पैसा कमावला त्यांनी नोटा जाळल्या, नदीत फेकून दिल्या. तरी देखील अजूनही जुन्या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न काहीजणांसमोर असताना ओदिशाच्या नौपाडा जिल्ह्यातील एका १७ वर्षीय युवकाने यावर नामी शक्कल शोधून काढली आहे.

जुन्या ५००च्या नोटेपासून या मुलाने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केल्याचा दावा केला असून या उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला पंतप्रधान कार्यालयाने यासंबंधी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या विद्यार्थ्याचे नाव लाचमन दुंडी असे असून तो खारीअर कॉलेजचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. या मुलाने ५०० रुपयाच्या जुन्या नोटेजून पाच वॉल्ट वीज निर्मिती शक्य असल्याचे सांगितले.

नोटेमध्ये जे सिलिकॉन कोटींग आहे त्याचा वापर वीज निर्मितीसाठी लाचमन करतो. नोट फाडून सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर इलेक्ट्रीक वायरच्या मदतीने सिलिकॉन प्लेटला ट्रान्सफॉर्मरशी जोडतो. त्यातून वीज निर्मिती होत असल्याचे लाचमनने सांगितले. पंतप्रधान कार्यालयाने १२ एप्रिल रोजी राज्य सरकारला दुंडी याचा दावा पडताळून बघण्यासाठी पत्र लिहीले.

ओदिशा सरकारने १७मे रोजी संबंधित खात्याला दुंडी यांच्या प्रोजेक्टवर अभ्यास करुन पंतप्रधान कार्यालयाला अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले. माझ्या शोधाला पंतप्रधान कार्यालयाने मान्यता दिली तो माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण असेल असे दुंडीने सांगितले. मी नोटाबंदीनंतर जुन्या नोटांच्या पूर्नवापराचा उत्तम पर्याय शोधला आहे असे त्याने सांगितले. मला ५०० रुपयाची नोट फाडल्यानंतर त्यात सिलिकॉन प्लेट आढळली आणि तिथून पुढे माझा शोध सुरु झाला. आतापर्यंत त्याच्या कॉलेजमध्ये दुंडीने हा प्रयोग करुन दाखवलाय. तिथे कोणी दखल घेतली नाही तेव्हा त्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले.

Leave a Comment