आता ऑनलाईन होणार पोस्टाचे व्यवहार


मुंबई : आपल्या खाकी पोतडीतून आतापर्यंत सुख -दुःखाच्या वार्ता लोकांपर्यंत पोहोचवणारे पोस्टमन काका आता हायटेक होणार असून आता पोस्टमनच्या सोबतीला एक नवे अॅप आले आहे. या अॅपद्वारे स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, पार्सल, बल्क डिलिव्हरी आणि रजिस्टर पोस्ट तातडीने ग्राहकांच्या हाती पडणार आहे. शिवाय ज्याने ते पाठवले आहे, त्यालाही पत्र डिलिव्हर झाल्याची माहिती तातडीने मिळणार आहे. त्यामुळे आता पोस्टमनचे निम्मे काम कमी होणार आहे. याशिवाय पोस्टमनच्या कामावर थेट वरिष्ठांचे लक्ष राहिल आणि केलेल्या कामाची कॉपी थेट कॉम्प्युटरवर मिळेल त्यामुळे पोस्टखातेही रिलॅक्स आणि ग्राहकही खुश झाले आहे.

Leave a Comment