आज काय सांगते आहे गुगलचे खास डूडल


मुंबई : ‘गूगल’ने आपल्या डूडलमधून जगप्रसिद्ध फ्रेंच नेत्रविशारद फर्डिनान्ड मोनोयर यांच्या १८१ व्या जयंतीनिमित्त आदरांजली दिली आहे. गूगलने आज एनिमेटेड ग्राफिकच्या माध्यमातून आपले डूडल रेखाटले आहे.

डायोप्टर या उपकरणाचा शोध फर्डिनान्ड मोनोयर यांनी लावला आहे. लेन्सच्या क्षमतेची तपासणी या उपकरणाच्या माध्यमातून करता येते. जगभरातील असंख्य नेत्ररुग्ण फर्डिनान्ड यांच्या कार्यामुळेच चांगली दृष्टी मिळवू शकले आहेत. तसेच नेत्रतज्ज्ञाकडे लावण्यात आलेला मोनोयर चार्ट फर्डिनान्ड यांनीच विकसित केला आहे.

१८७२ पासून जगभरात मोनोयर यांनी विकसित केलेला डायोप्टर आणि मोनोयर चार्ट वापरला जाऊ लागला. मोनोयर चार्टमध्ये वेगवेगळ्या आकारातील अक्षरांचा वापर केलेला असतो, ज्याच्या माध्यमातून दृष्टीची क्षमता पडताळता येते.

Leave a Comment