काश्मीरमधील ४० बँकांत रोख देवघेव बंद


दक्षिण काश्मीरमधील बँका लुटण्याचे दहशतवाद्यांचे कृत्य लक्षात घेऊन या सेंवदनशील भागातील सुमारे ४० बँक शाखांत रोख देव घेवीचे व्यवहार बंद केले गेले आहेत. पुलवामा व शोपिया या भागात या बँका आहेत. या बँक शाखांवर दहशतवादी हल्ले होऊन त्या लुटल्या जातील याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा एजन्सीतर्फे या बँकांना रोख देवघेव बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. अर्थात नागरिकांना एटीएम व कॅशलेसचा वापर करता येणार आहे. तसेच जवळ पासच्या बँकांमधून नागरिक रोख देवघेवीचे व्यवहार करू शकणार आहेत.

या भागातील जम्मू अॅन्ड काश्मीर बँक, इकलाई देहाती बँक शाखांनी त्यांचे रोख व्यवहार बंद केले आहेत. या दोन्ही बँकांच्या शाखांवर दहशतवाद्यांनी हल्ले करून या बँका लुटल्या होत्या. हाच प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता लक्षात घेऊन येथे रोख देवघेव बंद केली गेली आहे.

Leave a Comment