स्वस्त झाले स्टेट बँकेचे गृह कर्ज


मुंबई – गृह कर्जावरील व्याज दर पाव टक्क्यापर्यंत (०.२५ टक्के) भारतीय स्टेट बँकेने कमी केला असून बँकेचे ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना याचा लाभ होणार आहे. तर ३० लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्यांना ०.१० टक्केपर्यंत मिळाला आहे. नव्या दर कपातीची अंमलबजावणी तातडीने लागू होत आहे.

गेल्याच आठवड्यात तिच्या विविध मुदतीच्या ठेवींवरील दरही बँकेने तब्बल अर्ध्या टक्क्यापर्यंत केले होते. स्टेट बँकेने गृह कर्जावरील व्याजदर कमी केल्यानंतर आता हा कित्ता अन्य व्यापारी बँकांही गिरविण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेची ही दर कपात योजना मर्यादित कालावधीसाठी असून नवा वार्षिक ८.३५ टक्के दर हा ३१ जुलैपर्यंतच असेल. यामुळे स्टेट बँकेच्या कर्जदारांची मासिक हप्त्यात लाखामागे ५३० रुपयांची बचत होणार आहे.

Leave a Comment