फेसबुक लाईव्हवर केली कायद्यावर स्वाक्षरी


अमेरिकेत एका राज्याच्या गव्हर्नरनी कायद्याच्या मसुद्यावर फेसबुक लाईव्हवर स्वाक्षरी करून त्या विधेयकाला कायद्याचे स्वरूप दिले आहे.

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग ॲबोट यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली. ‘सँक्चुअरी सिटीज’ किंवा “अभय शहरे” असे या कायद्याला म्हटण्यात येत आहे. स्थानबद्ध केलेल्या लोकांना त्यांच्या स्थलांतर स्थितीबाबत पोलिस किंवा केंद्रीय तपास यंत्रणाचे अधिकारी या कायद्याद्वारे प्रश्न विचारू शकणार आहेत.

या कायद्याच्या विरोधात डेमोक्रॅट पक्ष व स्थलांतरितांच्या कैवारी संघटनांनी सोमवारी व मंगळवारी निदर्शनांचे आयोजन केले होते. मात्र रिपब्लिकन पक्षाचे असलेल्या ॲबोट यांनी रविवारी रात्रीच त्या कायद्यावर स्वाक्षरी केली. हा प्रसंग फेसबुकवर थेट प्रक्षेपित करण्यात आला. “इतके सारे लोक अमेरिकेत येतात कारण आपला देश हा कायदा पाळणारा देश आहे. ती परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न टेक्सास आपल्या परीने करत आहे,” असे या कार्यक्रमानंतर ॲबोट म्हणाले.

टेक्सासच्या गव्हर्नरनी सोशल मीडियावरून एखाद्या कायद्याला अंतिम रूप देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Leave a Comment