प्लास्टिक कच-याच्या समस्येवर निघणार तोडगा ?


प्लास्टिक खाणारा किडा संशोधकांनी केला तयार !
लंडन: प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निर्माण होणा-या प्रदूषणामुळे अवघे जग त्रस्त आहे. जगातील सर्वच देशासमोर प्लास्टिक हे नष्ट करता येत नसल्याने प्लास्टिकच्या कच-याची मोठी समस्या आहे. पण आता संशोधकांनी यावर एक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून प्लास्टिक खाणारा किडाच त्यांनी चक्क तयार केला आहे. जो प्लास्टिकच्या कच-यात सोडला की तो तेथील प्लास्टिक खातो.

प्लास्टिकच्या कपातून किंवा ग्लासातून पिणे हे आपल्याकडे आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हटले जाते. पण अलीकडेच प्लास्टिक खाणार्‍या किड्याचा शोध ब्रिटनच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी लावला आहे. हा किडा प्लास्टिक कुरतडून खातो. त्यामुळे या किड्याला प्लास्टिकवर्म अशा नावाने संबोधले जाते. या किड्याचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर हा किडा चक्क मधमाशांचे पोळेही पचवतो.

एकूण आठ कोटी टन प्लास्टिक जगभरात तयार केले जाते. फूड बॅग किंवा शॉपिंग बॅग बनवण्यासाठी या प्लास्टिकचा वापर केला जातो. परंतु हे प्लास्टिक विघटनासाठी अनेक वर्षही कमी पडतात, म्हणूनच यावर पर्याय म्हणून केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या किड्यांचा शोध लावला आहे. या किड्याचे नाव गॅलेरिया मेलोनेला असे असून हा किडा प्लास्टिक बॅगेला काही वेळातच छिद्र पाडून प्लास्टिक खाण्यास सुरुवात करतो. त्याचप्रकारे प्लास्टिक विघटनासाठी हा किडा कशाप्रकारे प्रक्रिया करतो यांवर संशोधन करून मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचे कसे विघटन करता येईल याचा विचार केला जात आहे.

Leave a Comment