अमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये रंगणार प्राईज वॉर


नवी दिल्ली : एक भव्य सेल ई कॉमर्स मधील नामवंत कंपन्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉन आणत असून मोठी स्पर्धा या दोन्ही कंपन्यांमध्ये सुरु होत आहे. ग्राहकांना या सर्वाचा फायदा होणार आहे.

आपल्या दशकपूर्ती निमित्ताने फ्लिपकार्ट १४ ते १८ मे दरम्यान बिग १० नावाने एक भव्य सेल आणत असल्यामुळे देशभरातील ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांची कमाई तीन ते चार पटीने वाढणार आहे. फ्लिपकार्टची फॅशन ईटेलक कंपनी मिंत्रादेखील सेल लावणार असल्याचेही वृत्त आहे. तर ११ ते १४ मे पर्यंत अमेझॉनचा ग्रेट इंडिया सेल असेल, ज्यामध्ये माफक दरात शानदार डील मिळणार आहे.

आपल्या ग्राहकांना यामध्ये फ्लिपकार्ट ८० टक्के डिस्काऊंट देणार आहे. तर दुसरीकडे अमेझॉनवरही एकापेक्षा एक डील ग्राहकांना मिळणार आहे. ई-कॉमर्स कंपन्यांची नोटाबंदीच्या काळात कमाई खुप कमी झाली होती. त्यामुळे या डीलमुळे ही तुट भरून काढली जाणार आहे. फ्लिपकार्टवर आपले प्रोडक्ट विकणाऱ्या कंपनीच्या सहनिर्मात्याने सांगितले की हा सेल भव्य असणार आहे आणि हा महासेल लोकांच्या पसंतीस उतरेल. याबाबत माहिती देताना फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, द बिग बिलिअन सेलपेक्षा खुप वेगळा हा सेल असणार आहे.

या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, कंज्यूमर इलेट्रोनिक्स, फॅशन आणि एसेसरीज विकत घेताना भव्य डिस्काऊंट मिळणार आहे. तर दुसरीकडे अमेझॉनवर प्रत्येक कॅटगरीमध्ये भव्य डिस्काऊंट मिळणार आहे.

Leave a Comment