न्यू जनरेशनची डिझायर करा बुक केवळ ११ हजार रुपयांत


मुंबई – आपली न्यू जनरेशनची डिझायरची बुकींग देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने सुरु केली असून १६ मे रोजी एकदम नव्या अवतारात येणारी ही सेडान कार लॉन्च केली जाणार आहे. तुम्ही केवळ ही कार ११ हजार रुपये देऊन बुकींग करु शकणार आहात. ही देशातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान आहे, जिला कंपनीने नव्या रुपात सादर केले आहे.

ऑक्सफर्ड ब्ल्यू, शेरवुड ब्राउन, गॅलेंट रेड, मॅग्मा ग्रे, सिल्की सिल्व्हर आणि आर्कटिक व्हाइट या रंगांमध्ये न्यू जनरेशनची डिझायर कार उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. देशभरातील जवळपास २००० डिलरशिपच्या माध्यमातून तुम्ही या कारची बुकींग करु शकणार आहात.

तुमच्याकडे तीन पर्याय न्यू जनरेशनची डिझायर कारची प्री-लॉन्च बुकींग करण्यासाठी उपलब्ध आहेत.तुम्ही १८०० २०० ६३९२ या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन कारसंदर्भात माहिती मिळवू शकता. फोनवर तुम्ही तुमची माहिती दिल्यास कंपनीकडून स्वत: तुम्हाला बुकींगसाठी संपर्क करतील. तुम्ही यासोबतच marutisuzuki.com वर जाऊनही कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊ शकणार आहात. तसेच मारुती सुझुकी शोरुममध्ये जाऊन तुम्ही कारची बुकींग करु शकाल. यासाठी तुम्ही देशभरातील २००० पेक्षाही अधिक शोरुमपैकी एका ठिकाणी जाऊ शकता.

Leave a Comment