
समर सरप्राईज ऑफर बंद झाल्यानंतर ग्राहकांना नव्या ऑफर रिलायंस जिओने देऊ केल्या असून धन धना धन ऑफरनंतर रिलायन्सने जिओफाय डिवाइससोबत एक नवी ऑफर आणली आहे. जिओफाय खरेदी केल्यास यूजर्सला १०० टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे किंवा १००० रुपयांची ४जी डेटा ऑफर दिली जाणार आहे. १९९९रुपये ऐवढी या डिवाईसची किंमत असून यूजरने जर नवे डिवाईस घेतले तर त्यासोबत १००० रुपयांची ऑफर दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला हा डिवाईस ९९९ रुपयांना मिळणार आहे.
जिओची आता जिओफायसाठी विशेष ऑफर
जिओकडून जिओफाय १०० परसेंट कॅशबॅक ऑफर देखील देण्यात आली आहे. जर यूजर्स जुन्या वाय-फाय डोंगलला एक्सचेंज करुन नवा जिओफाय डिवाइस घेतला तर त्यांना २०१० रुपयांचा फ्री ४ जी डेटा दिला जाणार आहे. यूजर्सला डिवाईससाठी फक्त १९९९ रुपये द्यावे लागणार आहेत. ज्यानंतर युजर्सला त्याच्यापेक्षा अधिक डेटा दिला जाणार आहे. ही ऑफर तेव्हाच मिळेल जेव्हा जुने डोंगल सुरु असेल.
