सध्या सोशल मीडियावर महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या दिलदारपणाची खूपच चर्चा असून एका ट्विटर युजरने काही दिवसांपूर्वी त्यांना मेन्शन करत एक ट्विट केले होते. एका रिक्षाचा फोटो त्या ट्विटमध्ये होता. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ या रिक्षाचालकाला एवढी आवडली की आपल्या रिक्षाला देखील त्याने या गाडीसारखेच मॉडीफिकेशन करून घेतले. रिक्षारुपी त्याची स्कॉर्पिओ रस्त्यावर धावू लागली. त्याचा हा वेडेपणा एकाला खूप आवडला आणि त्याच्या या मॉडीफिकेशने तो प्रभावितही झाला. आनंद महिंद्रांना त्याने ट्विटरवर मेन्शन करत हा फोटो शेअर केला.
आनंद महिंद्रांनाही पडली ‘त्या’ रिक्षावाल्याची भुरळ
भारतीयांमध्ये स्कॉर्पिओची क्रेझ किती आहे हे तुम्ही पाहू शकता अशी ओळ लिहित त्यांनी हा फोटो शेअर केला. या ट्विटची आनंद यांनी देखील लगेच दखल घेतली. या चालकाची डोकॅलिटी त्यांनादेखील एवढी आवडली की त्यांनी या रिक्षावाल्याला शोधून काढण्याचा आदेशच आपल्या कर्मचाऱ्यांना दिला. जवळपास दीड महिन्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला शोधून काढले. सुनिल असे रिक्षाची स्कॉर्पिओ करणाऱ्या या रिक्षाचालकाचे नाव असून तो मूळचा केरळचा आहे. आनंद महिंद्रा त्याच्या या स्कॉर्पिओ रिक्षाने एवढे प्रभावित झाले की त्यांनी ती रिक्षा संग्रहालयात ठेवण्याची इच्छा बोलून दाखवली. तसेच या बदल्यात सुनिलला त्यांनी नवा कोरा महिंद्रा सुप्रिमो मिनी ट्रकही भेट म्हणून दिला.
@anandmahindra .image shows how the scorpio design turned generic and popular among Indian roads. This mans way of "dream big" pic.twitter.com/jMoJiB5gGs
— Anil Panicker (@AnilPanicker3) March 19, 2017