
मुंबई : रिलायंसने जिओ मार्केटमध्ये जेव्हापासून आले आहे जिओ तेव्हापासून वेगवेगळे रेकॉर्ड स्थापित करत चालली आहे. दूरसंचार नियामक ट्रायच्या नव्या रिपोर्टनुसार रिलायंस जिओ डाउनलोड स्पीडमध्ये मार्च महिन्यापर्यंत टॉपवर होती.
इंटरनेट स्पीडमध्ये सर्व कंपन्यांना रिलायन्स जिओने टाकले मागे
रिलायंस जिओची डाउनलोड स्पीड मार्च महिन्यामध्ये १८.४८ एमबी एमबीपीएस होती. कंपनीचा आतापर्यंतचा हा सर्वात चांगला रिझल्ट होता. ट्रायच्या आंकड्यांनुसार मार्चमध्ये भारती एअरटेलच्या नेटवर्कवर डाउनलोड स्पीड एक एमबीपीएसने घटली असून ती ६.५७ एमबीपीएस होती. या यादीत वोडाफोन तीसऱ्या क्रमांकावर असून या मोबाईल नेटवर्क कंपनीचा डाऊनलोड स्पीड ६.१४ एमबीपीएस होता. आयडियाचा डाउनलोड स्पीड २.३४ एमबीपीएसने घटला असून आयडियाचा स्पीड ५.९ एमबीपीएस झाला आहे. एअरसेलचा डाऊनलोड स्पीड २.०१ एमबीपीएस होता तर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीएसएनएलचा डाऊनलोड स्पीड १.९९ एमबीपीएस होता.
