इस्त्रोने तयार केली सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक कार


नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) एकाच प्रक्षेपकातून तब्बल १०४ उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम केला, जगभरातून त्याचे कौतुक झाले. त्यानंतर इस्त्रोने आता एक सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक कार तयार केली असून ही कार संपूर्णत: स्वदेशी बनावटीची आहे.

या कारचे प्रात्यक्षिक तिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र येथे दाखविण्यात आले. ही पर्यावरणपुरक कार उंच, सखल भागावर देखील चालविता येत असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांमुळे सध्या पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे या नव्या कार सारखी वाहने बाजारात आल्यास प्रदुषण मुक्त अशी पर्यायी वाहतुक व्यवस्था निर्माण होऊ शकते असेही इस्त्रोने म्हटले आहे.

याबाबत इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, हाय एनर्जी लिथियम बॅटरी या कारमध्ये बसविण्यात आली असून सूर्यप्रकाशावर ही बॅटरी चार्ज करता येणे शक्य आहे. अशा प्रकारची कार बनविताना कारवर सोलार पॅनल बसविणे आणि त्याची बॅटरीशी जोडणी करणे हे मोठ आव्हान असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे.

Leave a Comment