महाराजा एक्स्प्रेसच्या दोन नवीन सहली: एका तिकीटावर दुसरे मोफत


मुंबई: ‘आयआरसीटीसी’ने आलिशान महाराजा एक्स्प्रेसच्या दोन नवीन सहली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. “सदर्न सोजोर्न” आणि “सदर्न ज्युएल्स” अशी या सहलींची नावे आहेत. “सदर्न सोजोर्न” सहलीत गोवा, हम्पी, मैसूर, अर्नाकुलम, कुमाराकोम आणि त्रिवेंद्रम यांचा समावेश आहे तर “सदर्न ज्युएल्स” मध्ये चेट्टीनाड, महाबलिपुरम, मैसुर, हम्पी आणि गोवा यांचा समावेश आहे.

भारतातील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी जून-जुलै दरम्यान या सहलींचे आयोजन करण्यात येत आहे.

महाराजा एक्स्प्रेसच्या किंवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन या गाडीच्या तिकिटांचे आरक्षण करता येईल. अधिक माहितीसाठी +91 9717635915 किंवा 9717640678 किंवा 9717640678 किंवा 9717639033 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयआरसीटीसीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment