किमान रक्कम खात्यात न बाळगल्यास बसेल दंड!


मुंबई: बचत खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने निश्चित केली असून खात्यात नव्या नियमांनुसार मासिक ऐवढी रक्कम न ठेवल्यास ग्राहकांना दंड भरावा लागणार आहे.

स्टेट बँकेने याआधी खात्यातील किमान रकमेची मर्यादा हटवली होती. त्यामुळे शून्य रुपयांमध्येही बचत खातेधारकांना आपले अकाऊंट वापरता येत होते. मात्र एप्रिल महिन्यापासून स्टेट बँकेने ही मर्यादा पुन्हा कायम ठेवली आहे. बँकेने ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागानुसार किमान रकमेची मर्यादा ठेवण्यात आली आहे. दंडाची रक्कमही त्याच पटीत खात्यातून वळती केली जाणार आहे. ही किमान रक्कम खात्यात न बाळगल्यास खातेधारकांना दंडही भरावा लागणार आहे. हा दंड खात्यातून वळता केला जाईल.

ग्रामीण भागातील खातेदारांना आपल्या अकाऊंटमध्ये किमान १००० रुपये, निमशहरी भागातील ग्राहकांना २००० रुपये, शहरी भागातील ग्राहकांना ३००० रुपये तर महानगरातील ग्राहकांना किमान ५००० रुपये रक्कम खात्यात ठेवावी लागेल.

ऐवढी असेल दंडाची रक्कम?

ग्रामीण – १००० रुपयांच्या खाली बँक खात्यातील शिल्लक आल्यास दंड भरावा लागणार आहे.
५०० ते १००० शिल्लक २० रुपयांचा दंड
२५० ते ५०० शिल्लक ३० रुपयांचा दंड
० ते २५० शिल्लक ५० रुपयांचा दंड

निम शहरीमधील दंडाची रक्कम
१००० ते २००० शिल्लक २५ रुपयांचा दंड
५०० ते १००० शिल्लक ५० रुपयांचा दंड
० ते ४९९ शिल्लक ७५ रुपयांचा दंड

शहरीभागातील दंडाची रक्कम
१५०० ते ३००० शिल्लक ४० रुपयांचा दंड
७५० ते १५०० शिल्लक ६० रुपयांचा दंड
० ते ७४९ शिल्लक ८० रुपयांचा दंड

महानगरीय भागातील दंडाची रक्कम
२५०० ते ५००० शिल्लक ५० रुपयांचा दंड
१२५० ते २५०० शिल्लक ७५ रुपयांचा दंड
० ते १२४९ शिल्लक १०० रुपयांचा दंड

Leave a Comment