बिल गेट्स यांचा एक उनाड दिवस!


नवी दिल्ली – नुकतेच भारत दौऱ्यावर जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस अशी ओळख असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आले होते. त्यांनी ट्विटरवर आपल्या भारत दौऱ्याचा एक फोटो देखील शेअर केला असून इंडिया गेट परिसरात रिक्षात बसून भ्रमंती करत असतानाचा तो फोटो होता. मी वर्षांतून किमान एकदा तरी भारताला भेट देण्याचा प्रयत्न करतो. मला या प्रत्येक भेटीत नेहमीच काहीतरी प्रेरणा मिळते, असे लिहित त्यांनी हा फोटो शेअर केला.

त्यांनी ‘इंडिया इज विनिंग इट्स वॉर ऑन ह्यूमन वेस्ट’ नावाचा ब्लॉगही लिहिला. बिल यांनी या ब्लॉगच्या माध्यमातून भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे देखील कौतुक केले आहे. शौचालयाचा मुद्दा मोदींनी आपल्या पहिल्याच भाषणात मांडला होता. हा संवेदशनशील विषय होता, शिवाय भारतीय नागरिकांना उघड्यावर शौचालयास जावे लागते ही लाजीरवाणीही बाब होती. पण त्यावर मोदींनी भाष्य केले. मी आतापर्यंत कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांना एवढे उघडपणे बोलताना पाहिले नव्हते. पण या विषयावर ते फक्त बोललेच नाही तर त्यांनी तोडगाही काढला. गावागावात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्याचे काम हाती घेतले.

भारतीयांचा त्यांच्या स्वच्छ भारत संकल्पनेलाही खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे पाहून आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले. मी भारतात आलेल्या या बदलाचा एक व्हिडिओही बनवला आहे. २०१४ मध्ये भारतातील फक्त ४३ टक्के जनता शास्त्रशुद्ध स्वच्छता गृहांचा लाभ घेत होती. पण हा आकडा गेल्या दोन वर्षांत ६३ टक्क्यांवर आला आणि याचा मला आनंद होतो आहे, असेही त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. बिल यांनी रिक्षातून प्रवास करतानाचा आपला फोटोदेखील शेअर करत भारताची प्रशंसा केली. भारत दौऱ्यात नेहमीच प्रेरणा घेणाऱ्या नव्या गोष्टी घडत असतात, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment