घरगुती गॅस अन् केरोसीनच्या किमतींचा भडका


नवी दिल्ली – तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याच्या रविवारच्या निर्णयानंतर ग्राहकांना सवलतीत मिळणाऱ्या घरगुती गॅस आणि केरोसीनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. घरगुती गॅस २ रुपयांनी तर केरोसीन २६ पैशांनी महागला आहे. दिल्लीमध्ये या १४.२ किलोच्या गॅसच्या किमतीत १.८७ पैशाची वाढ झाली असून तो आता ४४२.७७ रुपयास मिळणार आहे.

१ एप्रिल रोजी सवलतीच्या दरात मिळणाऱ्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ५.५७ रुपयांनी तेल कंपन्यांनी वाढविली होती. त्यामुळे १४.२ किलोचा गॅस दिल्लीतील ग्राहकांना ४४०.९० रुपयांना मिळत होता. १ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी गॅसच्या किमतीतील वाढ करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत याचा कोणताही परिणाम पाहायला मिळाला नाही.

केंद्र सरकार यापुढे दर महिन्याला गॅसच्या किमतीत २ रुपयाची वाढ करु शकते. तसेच मुंबईत केरोसीन सध्या १९.५५ रुपये प्रतीलिटर मिळते. सरकार दर महिन्याला सवलतीत मिळणऱ्या केरोसीनच्या किमतीत २५ पैशाची वाढ करणार आहे. दर महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीतील चढ-उतार पाहून भारतातील पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि केरोसीनच्या किमतीचा आढावा घेणार आहे. तसेच त्यांच्या किमतीत चढ किंवा उतार करणार असल्याची माहिती तेल कंपन्यांनी दिली आहे.

Leave a Comment