फ्लिपकार्टने मागे घेतली नो रिफंड पॉलिसी!


मुंबई : नो रिफंड पॉलिसी ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टने मागे घेतली असून कंपनीने ग्राहकांची संख्या कमी होत असल्याच्या चिंतेने काही लोकप्रिय श्रेणीमध्ये ही पॉलिसी पुन्हा लॉन्च केली आहे.

नुकतेच फ्लिपकार्टने वेबसाईटवरुन खरेदी केलेली उत्पादने परत करण्याच्या मोबदल्यात रिफंड देणे बंद केले होते. ग्राहकांना कंपनीच्या या निर्णयामुळे आता पुस्तके, होम हेकॉर अँड लाईफस्टाईल, फॅशन प्रॉडक्ट्स, फिटनेस इक्विपमेंट, म्युझिक इन्स्ट्रुमेंटसह इतर उत्पादनांवर आता रिफंड मिळवू शकतात. ही उत्पादने याआधी ग्राहक केवळ रिप्लेस करु शकत होते. मात्र कंपनी आताही मोबाईल फोन, फर्निचर, एअर कंडिशनर, वॉशिंग मशिन, टेलिव्हिजन यांसारख्या मोठ्या अप्लायन्स आणि स्मॉल अप्लायन्ससारख्या दुसऱ्या लोकप्रिय कॅटेगरीतील उत्पादनांवर रिफंड देत नाही.

परंतु कंपनीच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, फ्लिपकार्टची रिटर्न पॉलिसी फारच कस्टमर फ्रेण्डली आहे. एक वर्षांच्या काळात कंपनीच्या रिटर्न पॉलिसीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आमच्या ग्राहकांनी कायमच फ्लिपकार्टवर कोणत्याही अडचणीशिवाय रिटर्न एक्स्पीरिअन्सचा लाभ घेतला आहे. पण सत्य परिस्थिती अशी आहे की, ग्राहक फ्लिपकार्टवर १८०० कॅटेगरींपैकी सुमारे दोन तृतीयांशसाठी थेट वेबसाईटद्वारे रिफंडचा आग्रह करु शकतात. क्लोदिंग, फूटवेअर, आयवेअर आणि फॅशन अॅक्सेसरीज यांसारख्या निवडक कॅटेगरीत उत्पादने बदलण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जात होता, यात या कॅटेगरीमधील वस्तू बदलता येत होते. ऑनलाईन शॉपिंगकडे भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मागील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत फुल रिफंड अँड नो क्वेश्चन आस्क्ड रिटर्न पॉलिसी लॉन्च केली होती.

Leave a Comment