प्रीपेड, पोस्टपेड प्लान्स ‘जिओ’ने केले अपडेट


मुंबई : आपल्या ‘धन धना धन’ ऑफरनंतर आता प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स रिलायन्स जिओने अपडेट केले आहेत. ग्राहकांना ‘धन धना धन’ ऑफरमध्ये ३०९ रुपयांच्या रिचार्जमध्ये फ्री व्हॉईस कॉल आणि १ जीबी फोर जी डाटा प्रती दिवसांची सुविधा तर ५०९ रुपयांच्या रिचार्जमध्ये हीच लिमिट २ जीबी देण्यात आली आहे. याशिवाय १४९ रुपयांचा प्रीपेड प्लानही आहे. जिओने आता मात्र आपले प्लान अपडेट करत नवे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स सादर केले आहेत.

अवघ्या १९ रुपयांचा प्रीपेड युझर्ससाठी सर्वात स्वस्त प्लान आहे. एका दिवसासाठी असणाऱ्या या प्लानमध्ये प्राईम मेम्बर्सना अनलिमिटेड कॉलसोबतच २०० एमबी डाटा मिळेल. तर नॉन प्राईम मेम्बर्सना केवळ १०० एमबी डाटा मिळेल. प्रीपेड ग्राहकांसाठी यानंतर ४९ रुपये (३ दिवसांसाठी), ९६ रुपये (७ दिवसांसाठी), १४९ रुपये (२८ दिवसांसाठी) असेही प्लान्स सादर केले आहेत. याच पद्धतीन तीन नवे प्लान्स पोस्टपेड ग्राहकांसाठीही सादर करण्यात आले आहेत. रिलायन्स जिओच्या इतर प्लान्सचा लाभ घेण्यासाठी जिओ प्राईम सबस्क्रिप्शन घेणे गरजेचे आहे. याशिवाय ३०९, ५०९, ९९९, १९९९, ४९९९ आणि ९९९९ रुपयांचे प्लानही जिओकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Leave a Comment