बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी खर्च केले तब्बल २२ लाख


लॉस एंजल्स – ह्युमन बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी येथील ३० वर्षीय ओफेलिया व्हॅनिटी (Ophelia Vanity) हिने सर्जरीवर सुमारे २२ लाख रुपये खर्च केले आहेत. त्याचबरोबर बॉडी अधिक परफेक्ट व्हावी यासाठी तिला आणखी काही सर्जरी करण्याची इच्छा आहे.

याबाबत माहिती देताना ओफेलियाने सांगितले की, तिचे बार्बीसारखे दिसायचे हेच स्वप्न होते. तिने सांगितले की, मी जेव्हा लहान होते, त्यावेळी मला ख्रिसमस किंवा बर्थ-डे ला दरवर्षी डॉल मिळायच्या. त्या डॉल्सबरोबर खेळायला मला फार आवडायचे. त्या डॉल्सबरोबरचा तिची हळू हळू जवळीक निर्माण होऊ लागली. ही जवळीक एवढी जास्त होती की, तीही काहीसी डॉलसारखी दिसू लागली आणि तिची तशी इच्छाही वाढायला लागली.

डॉलसारखे दिसण्यासाठी आधी ओफेलियाने मेकअप सुरू केले. तसेच कपडेही ती परिधान करू लागली. वाढत्या वयाबरोबर तिच्यात अनेक बदलही झाले आणि ती बार्बीसारखी दिसू लागली. तिने सर्वात आधी २००९मध्ये चेहऱ्यावर ‘Botox’ इंजेक्शन घेतले. तसे पाहता त्यावेळी ती काही नर्व्हस होती. त्यानंतर तिने हा प्रकार सुरू ठेवला. जवळपास चार वर्षात तिने ओठ, डोळे, नाक आणि चेहऱ्यावर अनेक इंजेक्शन घेतले आणि सर्जरी करून घेतल्या.

तिने सांगितले की, माझे डोळे नैसर्गिकच मोठे आहेत. पण मला ते अधिक सुंदर बनवायचे आहेत. ओफेलियाने सांगितले की, बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवर आतापर्यंत तिने सुमारे 22 लाख रुपये (३५००० हजार डॉलर) खर्च केले आहेत. एवढेच नाही तर तिला ब्रेस्ट आणि बम इम्प्लांटही करायचे आहेत. त्यासाठी ती पैसे साठवत आहे. एका चांगल्या डॉक्टरच्याही ती शोधात आहे.