घ्या, आता स्मशानातही मोफत वाय-फाय


मोफत वाय-फाय असलेल्या (हॉट स्पॉट) जागांमध्ये आणखी एका जागेची भर पडली असून स्मशानातही ही सुविधा मिळण्याची सुरूवात झाली आहे. चेन्नईतील एका स्मशानात ही सोय शनिवारपासून उपलब्ध करण्यात आली आहे.

चेन्नईच्या अण्णानगर, न्यू आव़डी रोड येथे असलेल्या वेलंगाडू श्मशानात मोफत वाय-फाय सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. इंडियन कम्युनिटी वेल्फेयर ऑर्गनायझेशन, चेन्नई, ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन आणि रोटरी क्लब ऑफ मिनम्बाक्कम या संस्था-संघटनांनी मिळून हा उपक्रम सुरू केला आहे.

येथे मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे मृत व्यक्तीच्या परदेशात स्थायिक झालेल्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण पाहणे शक्य होईल, अशी अपेक्षा या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांजवळ व्यक्त केली. ज्यांना अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहता येत नाही, त्यांच्यासाठीही या सुविधेचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment