तासांवर मिळणार हॉटेल रूम्स


थोडक्या काळासाठी हॉटेल रूमची गरज आहे पण त्यासाठी दिवसभराचे भाडे भरावे लागल्याचा अनुभव अनेक प्रवासी, पर्यटक घेत असतात. यावर कांही हॉस्पिटॅलिटी चेन्स कंपन्यांनी तासांवर हॉटेल रूम्स मिळण्याची ऑफर देण्याची सुरवात केली असून त्यासाठी अनेक हॉटेल्सबरोबर टायअप केला आहे. याचा थेट फायदा प्रवासी व पर्यटकांना होणार आहे.

फ्राॅटेल डॉट कॉम, हॉस्पिटॅलिटी स्टार्टअप फ्रेशअप, लेमन ट्री हॉटेल चेन, बुकींग सिक्स अवरली, नाईन टू फाईव्ह अशा वेबसाईटवरून याची माहिती दिली गेली आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन्स, पर्यटन स्थळांच्या जवळपास असणार्‍या हॉटेल्ससाठी ही सुविधा सध्या सुरू केली जात आहे. लेमन ट्री हॉटेल चेनने या वर्षीपासूनच ही सुविधा देऊ केली असून येथील प्रमुख देविंदर कुमार म्हणाले, आमच्याकडे व्यवसायातील ६० ते ७० टक्के ग्राहक सायंकाळी येऊन सकाळी हॉटेल सोडणारे असतात. त्यासाठी त्यांना दिवसभरच्या भाड्याऐवजी तासांवर भाडे देण्याची सुविधा दिली जात आहे.

हॉस्पिटॅलिटी स्टार्टअप फ्रेशअपने तिरूपतीसाठी तासांवर हॉटेल सुविधा दिली आहे. कंपनीचे प्रमुख विनित रेड्डी म्हणाले आम्ही बंकरबेड, मिटींग रूम्स, रिलॅक्सेशन लाऊंज साठी तासांप्रमाणे भाडे आकारतो. दोन तीन तासांसाठी प्रतिव्यक्ती हा दर २९९ रूपयांपर्यंत पडतो. हैद्राबाद, बंगलोर, चेन्नई, रामेश्वरम येथेही ही सुविधा लवकरच उपलब्ध केली जात आहे.

Leave a Comment