रिलायन्स जिओमध्ये मेगा भरती


नवी दिल्ली – दूरसंचार क्षेत्रात विविध ऑफर्स लाँच करत सर्वांना धक्का देणा-या रिलायन्स जिओ कंपनीने तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना ही एक सुवर्णसंधीच असेल.

आपली फ्रि डेटाची ऑफर रिलायन्स जिओने लाँच केल्याने दूरसंचार क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. रिलायन्स जिओने लाँचिंगच्या वेळी १.२० लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यानुसार आता रिलायन्सने नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

रिलायन्स जिओने सेल्स डिस्ट्रिब्यूशन, इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, ऑपरेशन्स, कस्टमर सर्व्हिस, इन्फ्रास्ट्रक्चर, फायनान्स अँड अकाऊंटींग, बिझनेस डेव्हलपमेंट, सप्लाय चैन, कॉर्पोरेट अफेअर्स, एच आर (ह्युमन रिसोर्स), कॉर्पोरेट सर्व्हिसेस, मार्केटींग, प्रोडक्ट मॅनेजमेंट, आयटी, लिगल, रेग्युलेटरी आणि इतर विभागांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पाहूयात कुठल्या कॅटेगरिमध्ये किती नोक-यांची संधी उपलब्ध आहे.

या नोकरीसंदर्भात सर्व माहिती रिलायन्स जिओने आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी Careers.jio.com या लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment