कसा करावा मोदींनी लाँच केलेल्या ‘भीम आधार पे’चा वापर


नागपुरमध्ये डिजिटल आणि कॅशलेस भारतासाठी आधारकार्डवर बेस्ड असलेल्या भीम अॅपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँच केले असून तुमची कार्ड, मोबाईल, इंटरनेट कनेक्शन आणि इतर अनेक पासवर्डपासून हे अॅप लाँच झाल्यामुळे सुटका होणार आहे. फक्त एका अंगठ्याच्या माध्यमातून तुम्ही कोणतेही पेमेंट करू शकता. त्यामुळे जाणून घेऊन किती सोप्प आहे अंगठा लावून पेमेंट करणे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम अॅप तर डिसेंबरमध्येच लाँच केले होते. पण भीम अॅपमध्ये आधार पेमेंट सुविधा दिलेली नव्हती आणि आता जे अॅप लाँच झाला आहे त्यामध्ये आधार कार्डाची सुविधा असणार आहे. फक्त अंगठा लावून तुम्ही पेमेंट करू शकता.

आधार पे मर्चेंट मध्ये आधार इनेबल पेमेंट सिस्टम आहे. हे अॅप अशा लोकांसाठी बनवले आहे ज्यांच्याकडे डेबिट कार्ड, मोबाइल वॉलेट किंवा मोबाइल फोनची सुविधा नाही. आधार पे एक अॅप आहे जो फक्त मर्चेंट व्यक्तींजवळच असणार आहे. युझर्सला फक्त आपला आधार नंबर आणि मोबाइल नंबर, आपले बँक अकाऊंट आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी लिंक करायचे आहे.

या अॅपला विक्रेता प्ले स्टोरमधून फ्री डाऊनलोड करू शकतो. त्यानंतर आपल्या फिंगरप्रिंट आणि आधार कार्डच्या माध्यमातून रजिस्टर केले जाऊ शकते. त्यानंतर ग्राहकाकडून ऑनलाईन पेमेंट घेण्यासाठी ते तयार असेल. ग्राहकाच्या बँक अकाऊंटमधून पैसे सरळ त्या व्यापाऱ्याच्या अकाऊंटमध्ये जाणार. यासाठी ग्राहकाने त्याचा आधार नंबर सांगायला हवा आणि त्यांना आपल्या कोणत्या अकाऊंटमधून ट्रान्सफर करायचे आहे ते ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे.

ग्राहकाला आधार पे च्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डची गरज नाही. दुसऱ्या पेमेंट अॅप्स आणि POS मशीन प्रमाणे याला इंटरनेटची गरज नाही. तसेच यासाठी दोन नवीन इंसेटिव स्किम देखील सुरू केली आहे. यामध्ये तुम्हाला भीम कॅशबॅक आणि रेफरल बोनस मिळणार आहे.

Leave a Comment