E-KYC च्या माध्यमातून घेतलेले सिम बंद करणार जिओ


मुंबई : लवकरच अनेक सिम रिलायंस जिओ ब्लॉक करणार असल्यामुळे यूजर्स वेलकम ऑफरचा फायदा नाही घेऊ शकणार आहेत. ज्यांचे व्हेरिफिकेशन अजून झालेले नाही. सिम घेताना ज्यांनी फिंगरप्रंट व्हेरिफिकेशन केलेले नाही त्या लोकांचे सिम ब्लॉक केले जाणार आहेत. भोपाळमध्ये रिलायंस जिओच्या एका अधिकाऱ्याने याबाबतीत सांगितले की, ज्या लोकांनी बाहेर आधार कार्डने E-KYC च्या माध्यमातून सिम घेतले आहे त्यांचे सिम बंद केले जाणार आहे. सिम बंद होण्याचे मॅसेज देखील त्यांना रिलायन्स जिओकडून पाठवले जात आहेत.

इतर राज्याच्या आयडी प्रुफने तुम्ही जर सिम घेतले असेल तर मग रिलायंस जिओचे सिम बंद केले जाणार आहे. सिम घेतांना जर तुम्ही फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन केले नसेल तर तुम्हाला रिलायंस जिओची फ्री ऑफर नाही मिळणार आहे. त्यामुळे ब्लॉक होण्याआधी तुम्ही तुमचे डॉक्यूमेंट गॅलरीमध्ये जाऊन जमा करु शकता. रिलायंस जिओने १ एप्रिलपासून यूजर्सचे व्हेरिफिकेशन संबंधात काम सुरु केले आहे. मॅसेजच्या माध्यमातून लोकांना याबाबतीत सूचना दिल्या जात आहे.

Leave a Comment