जिओला टक्कर टेलीनॉरची धमाकेदार ऑफर


मुंबई : जिओच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर मुकेश अंबानी यांनी आणल्यानंतर आता नॉर्वेच्या टेलीनॉर कंपनीने देखील एक जबरदस्त ऑफर लॉन्च केली आहे.

नव्या ग्राहकांसाठी टेलीनॉरने १०३ रुपयांचा प्लॅन आणला आहे. यामध्ये १०३ रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना तीन महिने वॉईस कॉलिंग आणि ६० दिवस अनलिमिटेड ४-जी इंटरनेट डेटा फ्री मिळणार आहे. ही ऑफर सुरुवातीला देशातील काही भागामध्येच दिली जाणार आहे.

या यामध्ये ग्राहकांना २५ रुपयांचा टॉकटाइम देखील दिला जाणार आहे. सोबतच लोकल आणि एसटीडी कॉल २५ पैसे/ मिनटच्या दराने चार्ज लागणार आहे. प्लानची वैधता ९० दिवसांची असणार आहे. यूजर्सला रोज २ जीबी डेटा मिळणार आहे. टेलीनॉरचा हा नवा प्लान बीएसएनएलच्या ३३९ रुपयांच्या प्लान सारखा आहे.

Leave a Comment